२०२१-२२ : आयकर रिटर्न भरण्यास सीबीडीटीकडून मुदतवाढ

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष २०२१-२२ यामधील टॅक्स ऑडिट रिपोर्टच्या ऑडिटची गरज असलेल्या करदात्यांसाठी आयकर रिटर्न दाखल करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे. सीबीडीटीने मंगळवारी ही माहिती दिली. ज्या करदात्यांना टॅक्स ऑडिट रिपोर्टच्या ऑडिटची गरज नाही, त्यांना कोणतीही मुदतवाढ दिली गेलेली नाही. त्यांची आयकर रिटर्न भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी समाप्त झाली आहे.

आयकर विभागाने आता दंडाशिवाय टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची मुदत १५ जानेवारीपासून वाढवून १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने कोरोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि नव्या आयटी पोर्टलच्या वापरात सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे दंडाशिवाय टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची तारीख १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. यासोबतच या करदात्यांना रिटर्न जमा करण्याची मुदत २८ फेब्रुवारी २०२२ पासून वाढवून १५ मार्च २०२२ करणअयात आली आहे. आयकर विभागाच्या या निर्णयाचा फायदा आयकर रिटर्नच्या ऑडिटची गरज भासणाऱ्या करदात्यांना होईल. चार्टर्ड अकाउटंट्सची संस्था आयसीएआयने सीबीडीटी चेअरमनकडे इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याची मागणी केली होती. दुसरीकडे सेट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सला इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची मुदत न वाढविण्याबाबात ऑल ओडिसा टॅक्स अॅडव्होकेट्स असोसिएशनने कायदेशीर नोटीस बजावली होती.

जर ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली गेली नाही तर असोसिएशन ओडिसा हायकोर्टात जनहित याचिका दाखल करेल असा इशारा देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here