राज्यातील 100 सहकारी साखर कारखान्यांसाठी 216 एमडी उपलब्ध होणार

पुणे : राज्यातील सहकारी सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यरत कार्यकारी संचालकांच्या (एमडी) सेवानिवृत्तीनंतर वयाच्या 62 वरून वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत राज्यात 103 सहकारी साखर कारखाने सुरू असून 166 एमडी कार्यरत आहेत. तर साखर आयक्तालयाने तयार करण्यात येणाऱ्या पॅनेलमध्ये आणखी 50 एमडींची भर पडणार आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांसाठी 216 एमडी उपलब्ध असतील.

राज्य एमडी असोसिएशनचे (साखर) उपाध्यक्ष डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांबाबत शासनाने घेतलेल्या वय वर्षे 65 च्या निर्णयाचा लाभ सरसकट न होता खूपच कमी लोकांना तो होईल. दिलेल्या निकषांमध्ये सर्व कारखाने बसतीलच, असे नाही. आजही चांगल्या सहकारी साखर कारखान्यात अन्य अधिकाऱ्यांकडे प्रभारी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार देऊन काम सुरू आहे. 50 एमडींच्या पॅनेलचा निर्णय लवकर व्हावा, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here