२२ राज्ये आणि केद्रशासीत प्रदेशांनी घटवले पेट्रोल-डिझेलचे दर

केंद्र सरकारने दिवाळीच्या दरम्यान, पेट्रोल – डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ रुपये आणि १० रुपये प्रती लिटर कपातीची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर आतापर्यंत २२ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी पेट्रोल-डिझेलचे दर घटवले आहेत. केंद्र सरकारने ही माहिती दिली.

सरकारने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल, डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कपात करण्याच्या सरकारी निर्णयानंतर २२ राज्ये, केंद्रशासीत प्रदेशांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे.

या निवेदनानुसार, पेट्रोल दरात सर्वाधिक कपात कर्नाटकात झाली आहे. कर्नाटकात पेट्रोलचा दर १३.३५ रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. त्यानंतर पुदुच्चेरी आणि मिझोरोमने दर कमी केले आहेत. या राज्यांत अनुक्रमे १२.८५ रुपये आणि १२.६२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर डिझेलमध्ये सर्वाधिक कपात कर्नाटकने केली आहे. १९.४९ रुपये प्रती लिटरची कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पुद्दूचेरी आणि मिझोरामने कपात केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या उत्पादन शुल्कात दुप्पटीने कपात केली आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने विकासाची गती कायम ठेवली. आता डिझेलवरील उत्पादन शुल्क कपाीमुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here