ब्राझीलमध्ये कोरोनाचे 22,048 नवे रुग्ण

91

ब्राजील: ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशामध्ये कोरोना वायरस च्या रुग्णांची संख्या गेल्या 24 तासात 22,000 पेक्षा अधिक झाली आहे आणि 700 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, नव्या 22,048 रुग्णांसह एकूण कोरोंनाग्रस्तांची संंख्या 3,057,470 इतकी झाली आहे. मरणार्‍यांची संख्या नव्या 703 रुग्णांसह एकूण 101,752 झाली आहे. देशामध्ये 2.1 मिलियन पेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

संयुक्त राज्य अमेरिकेनंतर कोरोना वायरसच्या बाबतीत जागतिक स्तरावर ब्राजील दूसर्‍या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च ला कोविड 19 च्या प्रकोपाला महामारी घोषित केले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here