डी.वाय.पाटील कारखान्याकडून २३ कोटींची ऊस बिले अदा : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने २३ कोटी ६५ लाखांचे ऊसबिल ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामातील १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२४ या पाचव्या पंधरवड्याचे बिल अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी दिली.

आमदार पाटील म्हणाले की, कारखान्याने १२ फेब्रुवारी अखेर ४ लाख ५५ हजार ८३० मे. टन ऊसाचे गाळप करुन ४ लाख ८५ हजार ६५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा डिस्टीलरी व कोजनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कारखान्याने १ ते १५ जानेवारी या पंधरवड्यात गाळप केलेल्या ७३ हजार ९३३ मे. टन ऊसाचे ३२०० रुपयांप्रमाणे होणारे बिल आदा केले आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here