उत्तर प्रदेशातील औरैया मध्ये दोन ट्रकची धडक, 24 मजूरांचा मृत्यु

146

औरैया: औरेया मध्ये दोन ट्रकची जोरदार धडक झाली, या दुर्घटनेत ट्रकमधून प्रवास करणार्‍या 24 मजुरांचा मृत्यु झाला असुन अनेक जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटे 3.30 वाजता झाली. सर्व मजूर, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल येथील होते. मुख्य चिकित्सा अधिकारी अर्चना श्रीवास्तव यांनी सांगितले की, 15 लोकांना उपचारासाठी सैफई पीजीआई रेफर करण्यात आले आहे. 24 लोक मृत झाले, 22 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि जे गंभीर जखमी होते त्यांना सैफई पीजीआई रेफर करण्यात आले आहे. हे मजूर राजस्थान मधून बिहार आणि झारखंड मध्ये जात होते.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयुक्त आणि महानिरिक्षक कानपूर यांना घटनास्थळाचा दौर करुन दुर्घटनेच्या कारणांचा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here