जेएनपीटी च्या ट्रॅफिकमध्ये 26 टक्के घट

मुंबई: कोरोना वायरस महामारीच्या प्रकोपाचा परिणाम देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट जेएनपीटी वरही झाला आहे. बंदराच्या जुलैपर्यंत च्या ट्रॅफिकमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 26 टक्क्यापर्यंत घट झाली आहे, पण आता देशभरामध्ये अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने येणार्‍या काळात यामध्ये नक्कीच सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले की, कोविड 19 महामारी ने दोन महिन्यांसाठी सर्व आर्थिक हालचालींना बंद केले होते, ज्याचा थेट परिणाम जेएनपीटी च्या ट्रॅफिकवर दिसून आला आहे. सेठी म्हणाले, मार्च ते जुलै दरम्यान जेएनपीटी मध्ये एकूण ट्रॅफिक मध्ये 26 टक्के घट झाली आहे. आता आशादिसत आहे, कारण जुलैमध्ये 19 टक्क्यापेक्षा अधिक सुधारणा दिसत आहे. बंदरावर माल जून च्या तुलनेत 19 टक्के वाढून जुलैमध्ये 48.5 लाख टनावर पोचला आहे.

त्यांनी सांगितले की, जूनपर्यंत,परिस्थिती कुठेही चांगल्या नव्हत्या, पण जुलै महिना अधिक चांगला राहिला आहे. एप्रिल आणि मे च्या दरम्यान पूर्ण लाकॅडाउन मुळे निर्यात प्रतिबंधावर परिणाम झाला होता, जुलैमध्ये पुन्हा सर्व सुरळीत होत आहे.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here