‘आजरा साखर’साठी तिसऱ्या दिवशी २७ अर्ज दाखल

कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर गट कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (8 नोव्हेंबर) अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी २६ जणांचे २७ अर्ज दाखल झाले आहेत. तिसऱ्या दिवशी अखेर एकूण ६८ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार अंतिम दिवस आहे. बुधवारी गट क्र. १ उत्तूर- मडिलगेमधून माजी उपसभापती दीपक देसाई, शिरीष देसाई यांच्यासह चार अर्ज दाखल झाले आहेत. गट क्र. २ आजरा- श्रृंगारवाडीमधून अभिषेक शिंपी यांचे दोन व शिवाजी नांदवडेकर यांच्यासह एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत.

क्र. ३ पेरणोली- गवसेमधून रणजित देसाई यांच्यासह दोन अर्ज दाखल झाले आहेत. गट क्र. ४ भादवण- गजरगावमधून विद्यमान उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी यांच्यासह चार अर्ज दाखल झाले आहेत. गट क्र. ५ हात्तिवडे-मलिग्रेतून सहा अर्ज दाखल झाले आहेत. ‘ब’ वर्ग सभासद गटातून नामदेव नार्वेकर यांचा एक अर्ज दाखल झाला आहे. महिला गटातून दोन अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागास गटातून अभिषेक शिंपी यांच्यासह चार अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती गट व भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून तिसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here