शाहजहांपूर : जिल्हाधिकारी इंद्रविक्रम सिंह यांनी साखर कारखानदारांना ऊस बिलांच्या वितरणात गती देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १.३० लाख शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळाले आहेत असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ऊस बिले वितरण तसेच ऊस समित्यांच्या अंशदानाबाबत आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन केले. जिल्ह्यात आतापर्यंत ७३ टक्के ऊस बिलांचे वितरण केले गेले आहे. मात्र, ऊस उत्पादकांचे २७ टक्के पैसे अद्याप शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
निगोही कारखान्याने ९६.०२ टक्के पैसे दिले आहेत. तर महसूदपूर कारखान्याने फक्त २२.१३ टक्के पैसे दिले आहेत. रोजा साखर कारखान्याने ८५.६० टक्के ऊस बिले अदा केली आहेत. तर तिलहर कारखान्याने शेतकऱ्यांना ६५.९१ टक्के ऊसाचे पैसे दिले आहेत. पुवाया कारखान्याने ६२.७१ टक्के पैसे दिले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मकसूदपुर कारखान्याने सर्वात कमी पैसे दिले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मकसूदपूर कारखान्याचे महा व्यवस्थापक हितेंद्र सिंह यांनी सांगितले की, साखर विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतील ८५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. कारखान्याचे कॅश क्रेडिट लिमिट वाढले नसल्याने अडचणी आल्या आहेत. तर निगोही साखर कारखान्याने उर्वरीत चार टक्के थकीत रक्कम ३० जूनपर्यंत दिली जाईल असे सांगितले. रोजा कारखान्याचे महा व्यवस्थापक ब्रजेश शर्मा यांनी १५ जुलैपर्यंत सर्व पैसे दिले जातील असे सांगितले. पुवायां कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर. सी. श्रीवास्तव यांनीही लवकरच शेतकऱ्यांचे पैसे अदा केले जातील असे आश्वासन दिले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link