श्री विठ्ठल कारखान्याचा सोलापूर जिल्ह्यात २८२५ रुपये उच्चांकी दर : चेअरमन अभिजित पाटील

सोलापूर : श्री विठ्ठल कारखान्यातर्फे चालू गळीत हंगामात नोव्हेंबरमध्ये गाळपास येणाऱ्या उसास प्रति टन २८२५ रुपये दर, तर डिसेंबरमध्ये येणाऱ्या उसास २८५० रुपये, जानेवारीमध्ये येणाऱ्या उसास २९०० रुपये , फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या उसास २९५० रुपये व मार्चमध्ये गळितास येणाऱ्या उसास ३००० रुपये पहिला हप्ता जाहीर करण्यात आला. हा जिल्ह्यातील सर्वाधिक दर असल्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले.

 

श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या २,००,१११ साखर पोत्यांचे पूजन तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, संजय पाटील घाटणेकर, महेश साठे, संभाजीराजे शिंदे, शिवाजी साळुंखे, अॅड. दिनकर पाटील, अॅड. अर्जुनराव पाटील, चंद्रशेखर कोंडूभैरी, सचिन नकाते, प्रा. आप्पासाहेब पाटील, हरिदास घाडगे, तात्यासाहेब निकम, ह.भ.प.माऊली महाराज पवार यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

 

चेअरमन पाटील म्हणाले, या गळीत हंगामामध्ये कारखान्याने १७ दिवसांमध्ये १,३८,४०० गळीत केलेले असून को जन प्रकल्पातून ५३,६७,००० युनिट वीज निर्यात केली असून डिस्टिलरी प्रकल्पातून ८,३६,७३८ लिटरचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी इतर कारखान्यांच्या भूलथापांना बळी न पडता संचालक मंडळाने ठेवलेल्या ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण पिकविलेला संपूर्ण ऊस श्री विठ्ठल कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

 

तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर म्हणाले, दोन वर्षे बंद असलेला कारखाना सुरू झाल्यामुळे तालुका प्रशासनावर असलेला ताण कमी झाला आहे. याचे सर्व श्रेय कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व संचालक मंडळास जाते. या प्रसंगी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, अॅड. दिनकर पाटील, प्रा. तुकाराम मस्के, डॉ. बब्रुवाहन रोंगे, संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, जनक भोसले, प्रवीण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सीताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, कलावती महादेव खटके, सविता विठ्ठल रणदिवे, तज्ज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here