बिहारमध्ये इथेनॉल प्लांटसाठी २९ कंपन्या इच्छुक

61

भागलपूर : बिहारमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी २९ कंपन्यांनी स्वारस्य दर्शविले आहे असे उद्योगमंत्री सैयद शाहनवाज हुसेन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. भागलपूरमधील साहू परवत्तामध्येही इथेनॉल प्लांट स्थापन केला जाईल. त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतील असे यावेळी मंत्र्यांनी सांगितले.

जागरण डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भागलपूरमध्ये भारत प्लस इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड आणि बांका येथे भागलपूर बायोरेफरन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इथेनॉल प्लांट सुरू करण्याबाबत स्वारस्य दर्शविले आहे असे मंत्री हुसेन यांनी सांगितले.

केंद्र सरकारने क्रूड ऑईल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे. बिहारमध्ये नव्या इथेनॉल उत्पादन धोरणामुळे राज्यात गुंतवणूक वाढली आहे. अनेक उद्योजकांनी, बिहारमध्ये कंपन्यांनी इथेनॉल प्लांट सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून २०२१ रोजी पुढील २०२५ पर्यंत भारतामध्ये इथेनॉल मिश्रणासाठीच्या रोडमॅपवरील एका विशेष समितीचा अहवाल जारी केला होता. या रिपोर्टनुसार २० टक्के इथेनॉल मिश्रण अद्याप दूर आहे. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणातून देशाला चांगला लाभ मिळू शकतो. दरवर्षी ३०,००० कोटी रुपयांच्या परकीय चलनाच्या बचतीसह ऊर्जा सुरक्षा, कमी कार्बन उत्सर्जन, हवेची चांगली गुणवत्ता, आत्मनिर्भरता, खराब धान्याचा वापर यासोबतच शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, रोजगार आणि गुंतवणुकीच्या अधिक संधी असे फायदे यापासून होणार आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here