देशात १५ एप्रिल अखेर २९०.९१ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन: इस्मा

87

नवी दिल्ली : इंडियन शुगर मील असोसिएशनच्या नवव्या अहवालानुसार, देशभरातील साखर कारखान्यांनी १५ एप्रिल २०२१ अखेर २९०.९१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत झालेल्या २४८.२५ लाख टन साखर उत्पादनापेक्षा हे ४२.६६ लाख टनाने वाढले आहे. गेल्या वर्षी १५ एप्रिल २०२० रोजी गाळप करणारे १४० कारखाने सुरू होते. यंदा १५ एप्रिल २०२१ अखेर १७० कारखाने सुरू आहेत.

महाराष्ट्रातील साखर उत्पादन उत्तर प्रदेश पेक्षा अधिक
महाराष्ट्रात १५ एप्रिल २०२१ पर्यंत १०३.९५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत फक्त ६०.७६ लाख टन साखर उत्पादन झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४३.१९ लाख टन साखर उत्पादन अधिक झाले आहे. सध्या १३६ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. सद्यस्थितीत ५४ कारखाने सुरू आहेत ‌ गेल्या वर्षी याच काळात फक्त १० कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी ०.९ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.
उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखान्यांनी १५ एप्रिल २०२१ पर्यंत १००.८६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत १०८.२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. सध्या १२० पैकी ५४ कारखाने बंद झाले आहेत. तर ६६ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत ९८ कारखाने सुरू होते.

कर्नाटकात हंगाम संपुष्टात, तामिळनाडूत अद्याप सुरूच
कर्नाटकात १५ एप्रिल २०२१ पर्यंत ६६ कारखान्यांनी ४१.४५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. आतापर्यंत सर्व कारखाने बंद झाले आहेत. तर दक्षिण कर्नाटकात काही कारखाने जुलै-सप्टेंबर २०२१ पर्यंत खास सिझनमध्ये काम करणार आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत सर्व ६३ कारखान्यांनी गाळप बंद केले होते. आणि ३३.८२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
तामिळनाडूत या हंगामात २७ पैकी ५ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. १५ एप्रिल २०२१ पर्यंत राज्यात ५.८५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत २४ कारखान्यांकडून ५.० लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी ८ कारखाने १५ एप्रिल २०२० पर्यंत सुरू होते. गेल्यवर्षी खास सिझनमध्ये तामिळनाडूत २.० लाख टन साखर उत्पादन केले होते. गुजरातमधील कारखान्यंनी १५ एप्रिलपर्यंत ९.५० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ८.८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

उर्वरीत आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, ओडिसात एकूण १५ एप्रिलअखेर २९.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here