देशात ३.०२ कोटी टन साखर उत्पादन शक्य: ISMA

नवी दिल्ली: यंदाच्या साखर हंगामात साखरेचे उत्पादन ३.०२ कोटी टन होईल असा अंदाज साखर कारखानदारीतील शिखर संस्था इस्माने व्यक्त केला आहे. इस्माने आपल्या अनुमानात ८ लाख टनाची घट कपात केली आहे.
इस्माने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२०-२१ मधील ऑक्टोबर ते सप्टेंबर या गळीत हंगामात इथेनॉलचे उत्पादनासाठी उसाचा सुमारे २० लाख टन रस वापर होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादनाचा अंदाज घटविण्यात आला आहे. नव्या अंदाजानुसार २०१९-२०मध्ये दोन कोटी ७४.२ लाख टनहून अधिक उत्पादन आहे. भारतीय साखर कारखाना संघाच्या पूर्व अनुमानानुसार, चालू सत्रामध्ये ३.१ कोटी टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. आता सुधारीत पाहणीनंतर देशामध्ये २०२०-२१ या कालावधीत ३.०२ कोटी टन साखरेचे उत्पादन होईल. देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये या हंगामात १.०५ कोटी टन साखर कमी उत्पादीत होईल असा अंदाज आहे. गेल्या हंगामात एक कोटी २६.३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. दुसरीकडे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात गेल्यावेळच्या ६१.६ लाख टनाच्या तुलनेत वाढून १ कोटी ५.४ लाख टन साखर उत्पादन होईल. राज्यात ऊस लागवडीत ४८ टक्क्यांची वाढ दिसून आल्याने कारखाने जादा गाळप करीत आहेत. साखर उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकात गेल्यावेळच्या ३४.९ लाख टन साखर उत्पादनावरून ते आता ४२.५ लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इस्माच्या अभ्यासानुसार एक ऑक्टोबर २०२० रोजी साधारणतः १.०७ कोटी टन साखरेचा स्टॉक असल्याचे लक्षात घेऊन देशामध्ये हंगामाच्या शेवटपर्यंत सरासरी ८९ लाख टनापर्यंत साखरेचा स्टॉक शिल्लक राहील असे वाटते. सरकारने २०२०-२१ या गळीत हंगामात साखर कारखान्यांच्या आर्थिक तरतलेमध्ये सुधारणेसाठी दोन निर्णय घेतले. या हंगामात ६० लाख टन साखरेची निर्यात आणि इथेनॉलच्या दरांत सुधारणा याचा यामध्ये समावेश आहे. याचे साखर उद्योगानेही स्वागत कले आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांना लवकर पैसे देऊ शकतात. त्यासाठी साखरेची एमएसपी वाढविण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here