यावर्षी 24 डिसेंबरपर्यंत 3.97 करोड आईटीआर दाखल

102

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षामध्ये 24 डिसेंबरपर्यंत 3.97 करोड करदात्यांनी आकलन वर्ष 2020-21 (वित्त वर्ष 2019-20) साठी आयकर रिटर्न दाखल केले आहे. आयकर विभागाने शुक्रवारी ही माहिती दिली. विभागाने ट्वीट केले की, 24 डिसेंबर 2020 पर्यंत 3.97 करोड आयकर रिटर्न यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे. तुम्ही आपला रिटर्न दाखल केला का? जर नसेल तर आजच करा.

विभागाने सांगितले की, 2.27 करोड करदात्यांनी आईटीआर 1 भरला आहे तर 85.20 लाखांनी आईटीआर 4, 46.78 लाख लोकांनी आईटीआर 3 आणि 28.74 यांनी आईटीआपर 2 भरला आहे. व्यक्तिगत करदात्यांसाठी वर्ष 2019-20 रिटर्न आकलन वर्ष 2020-21 मध्ये 31 डिसेंबर 2020 पर्यंतचा वेळ आहे. तर ज्या लोकांच्या खात्यासाठी ऑडिट गरजेचे असते त्यांच्याासठी रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here