जीएसटी भरण्यासाठी ३ महिने मुदतवाढ ; केंद्रिय अर्थ मंत्रालयाचा निर्णय

कोल्हापूर : राष्ट्रीय स्तरावर जीएसटी प्रणाली लागू केल्यानंतर यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. या अंतर्गत जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१९ अखेर होती. पण देशभरातील समस्त उद्योग जगताकडून जीएसटी भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होती. या मागणीचा विचार करुन जीएसटी वार्षिक रिटर्न भरण्याची मुदत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून तीन महिन्याने वाढवली आहे. आता ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत जीएसटी भरता यईल, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

जीएसटी मध्ये अनेक नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या नवीन असलेल्या करप्रणाली अनुसार हे रिटर्न भरणे व्यापारी उद्योजक, कर सल्लागार यांच्यासाठी सुद्धा आवश्यक होते. ही आवश्यकता ओळखून जीएसटी भरण्याची मुदत तीन महिन्याने वाढवली आहे.

मुदतवाढ करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था फिक्की, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
शिवाय, महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उद्भवलेल्या पूरस्थिती मुळे व्यापारी उद्योजकांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. मशिनरी, साहित्य पूराच्या पाण्यात गेल्यामुळे उद्योगांचे खूप नुकसान झाले आहे.

अशा परिस्थितीमध्ये दिलेल्या मुदतीत जीएसटीचे विवरणपत्र भरणे अत्यंत अवघड बनले होते. व्यापारी उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून ही मुदतवाढ देण्याचे आश्वासन पूर्ण केले असून आज यासंबंधीचे अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या या निर्णयाचे देशभरातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक व कर सल्लागार स्वागत करीत असल्याची माहिती चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here