सरसेनातपती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे होणार विस्तारीकरण

कोल्हापूर : कागल तालुक्यातील सरसेनातपती घोरपडे साखर कारखान्याने आता चांगलीच गती घेतली असून, कारखान्याची घोडदौड  जोरात सुरु आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रति दिवस सहा हजार टनावरुन दहा हजार मेट्रीक टन करणे, तसेच 50 हजार लिटर इथेनॉल निर्मिती वाढवून ती एक लाख लिटर इतकी करणे,  सहविज प्रकल्प निर्मिती 23 मेगावॅट वरुन 50 मेगावॅट करणे अशा प्रकरच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या विस्तारीकरणासाठी तब्बल 300 कोटींचा निधी उभारला असून, हे काम पुढच्या वर्षी सुरु होईल, असे कारखान्याचे अध्यक्ष नावेद हसन मुश्रीफ यांनी सोंगितले.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात स्थित आहे . कारखान्याची विकासाची गती चांगली आहे. या कारखान्यात सरव्यवस्थापक संजय श्यामराव घाटगे नव्याने रुजू झाले आहेत. त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे संस्थापक, ग्रमविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते घाटगे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी नावेद मुश्रीफ म्हणाले, घोरपडे कारखान्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वीच शेतकर्‍यांची संपूर्ण ऊस थकबाकी  भागवली आहे. तसेच गेल्या हंगामामध्ये त्यांनी ऊसासाठी प्रतिटन 100 रुपये अधिक देण्याची घोषणा केली होती, पण त्यापैकी गणेशोत्सवाला 50 रुपये देण्यात येणार असून, उरलेले पैसे दसरा दिवाळी सणांवेळी देण्यात  येणार आहेत. त्याचप्रमाणे कर्मचार्‍यांनाही वेतन मंडळाप्रमाणे पगार देण्यात येणार आहे. आंबेओंहोळ आणि नागणवाडी हे दोन्ही सिंचन प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत , ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. यामुळेच कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here