सहकार शिरोमणी कारखान्याकडून उशीराच्या उसाला ३००० रुपये दर : कल्याणराव काळे

सोलापूर : चालू गळीत हंगामामध्ये एक मार्चपासून गळितास येणाऱ्या उसाला प्रती टन तीन हजार रुपये दर देण्याचा निर्णय सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे ऊस उत्पादनात आणि साखर उताऱ्यात होणारी संभाव्य घट विचारात घेऊन उतारा घट अनुदानाच्या स्वरुपात प्रती टन तीनशे रुपये जादा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अगोदरचे २७०० व वाढीव ३०० असे तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत, असे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी सांगितले.

अध्यक्ष काळे यांनी सांगितले की, ऊस दराच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर कारखान्यांच्या बरोबरीने कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिला हप्ता प्रतिटन २७०० रुपये जाहीर केला. २७०० रुपयांप्रमाणे ऊस बिल आणि ऊस तोडणी वाहतूक कमिशनसह वाहनमालकांची बिले हंगाम सुरू झाल्यापासून दहा दिवसाला संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत.कार्यक्षेत्रातील व कार्य क्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास गळितास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कल्याणराव काळे, भारत कोळेकर, कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here