भारतामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 30 हजार कोविड रूग्णांची नोंद

95

गेल्या दोन दिवसांपासून भारतामध्ये दररोज जवळपास 30,000 कोरोना बाधित नवीन रूग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे नवीन 29,163 रूग्ण आढळले. गेल्या सलग दहा दिवसापासून देशामध्ये दररोज 50,000पेक्षा कमी कोरोनाचे रूग्ण नोंदवले जात आहेत.

कोविड आजारातून बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 40,791 कोरोनाचे रूग्ण बरे झाले. तर गेल्या 24 तासांमध्ये 29,163 जणांना कोविड झाल्याची नोंद आहे.

सरकारने संपूर्ण देशभर कोविड चाचण्या करण्याचे प्रमाण कायम ठेवले आहे. एका दिवसात देशामध्ये 12,65,907 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रूग्णांच्या संख्येमध्ये 7.01टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे.

देशामध्ये 4,53,401 कोविडचे सक्रिय रूग्ण आहेत. एकूण रूग्णांपैकी हे प्रमाण फक्त 5.11 टक्के आहे. या आजारातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 82,90,370 आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून आज ते 93.42 टक्के झाले आहे.

(Source: PIB)

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here