मुजफ्फरनगर : साखर कारखान्यातून दहा टन साखर घेऊन पसार झालेल्या कँटर चालकासह दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३१ क्विंटल साखर आणि कँटर हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात साखर व्यावसायिकाने तीन ऑगस्ट रोजी मन्सूरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती.
भौराकला परिसरातील शिकारपूर गावातील साखर व्यावासियाक साजिद यांनी भोकरहेडी येथील कँटर चालक अब्दुल सलाम याला मन्सूरपूर साखर कारखान्यातून २२ जुलै रोजी दहा टन साखर पंजाबला पाठविण्यासाठी दिली होती. हा ट्रक ठरलेल्या वेळेत पंजाबला न पोहोचल्याने त्याचा शोध सुरू झाला. मात्र, चालकाचा पत्ता लागला नाही. साखर व्यावसायिकांनी चालक अब्दुल सलामच्या विरोधात साखर चोरीची फिर्याद नोंदवली होती. पोलिसांनी कारवाई करत मन्सूरपूर शाहपूर रोडवरील केन यार्डजवळ थांबलेल्या कँटरमधून ३१ क्विंटल साखर ताब्यात घेतली. यावेळी कँटर चालक अब्दुल सलामसह भोकरहेडी येथील गुऱ्हाळ घर मालक शाहीदला अटक केली. खतौलीचे मुख्य अधिकारी राकेश सिंह यांनी सांगितले की कँटर चालकाने मन्सूरपूर साखर कारखान्यातून दहा टन साखर लोड करून घेतल्यानंतर चोरून ते गुऱ्हाळघर मालक शाहीदला विकली. अटक केलेल्या दोघांची कोठडीत रवानगी करण्यात आली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link