‘कुंभी-कासारी’तर्फे ३२०० रुपयेप्रमाणे ऊस बील जमा : चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके

कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याने हंगाम २०२३-२४ करिता प्रतिटन रुपये ३३०० प्रमाणे ऊसदर जाहीर केला आहे. तत्पूर्वी चालू हंगामाकरिता प्रतिटन रुपये ३२०० प्रमाणे ऊसदर देण्याचे निश्चित केल्यानुसार चालू गळीत हंगामात नोव्हेंबर २०२३ अखेर गळीतास आलेल्या उसासप्रतिटन रुपये ३२०० प्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांच्या बॅक सेव्हिग खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.

चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले कि, यंदाच्या हंगाम दि. १८ ते ३० अखेर गळीतास आलेल्या ५९ हजार ५० मे. टन उसाची एफ.आर.पी. रुपये ३२०० प्रमाणे होणारी रुपये १८ कोटी ८९ लाख ६३ हजार इतकी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. यावेळी व्हा. चेअरमन विश्वास पाटील, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, दीपक चौगले, नामदेव पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here