कर्नाल कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ३३.८३ कोटी जमा

कर्नाल : कर्नाल सहकारी साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामातील ३८.८७ लाख क्विंटल ऊस गाळप केला होता. एकूण १३५.९८ कोटी रुपये देय होते. कारखान्याने यापूर्वी १६ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसाचे पैसे दिले होते. त्यानंतर आता २४४३ शेतकऱ्यांना ३३.८३ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती कारखान्याच्या कार्यकारी संचालक आदिती यांनी दिली.

कारखान्याकडून शेतकऱ्यांना १६ एप्रिलनंतरची एवढीच रक्कम देय होती. त्यामुळे शेतकऱ्यांची थकबाकी नसल्याचे आदिती यांनी सांगितले. या हंगामासाठी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवून ३५०० क्विंटल प्रती दिन करण्यात आली आहे. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १३५ गावांमध्ये शेतकऱ्यांनी २२ हजार ४५४ एकरमध्ये ऊसाची लागवड केली आहे. तर गेल्यावर्षी फक्त १९ हजार एकरात उसाची लागण होती. यंदा कारखान्याने ५५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे.

शेतकऱ्यांकडून उसाची योग्य पद्धतीने देखभाल झाली आणि अनुकूल हवामान राहिल्यास हे उद्दीष्ट सहजसाध्य होईल असे आदिती यांनी सांगितले. यावर्षी शेतकऱ्यांनी ०२३८ या जातीऐवजी को ०११८, कोएच ०१६०, को १५०२३ या जातींची अधिक लागवड करण्यात आली आहे. पुढील हंगामात को ०२३८ या प्रजातीची लागवड आणखी ३० ते ४० टक्क्यांनी कमी केली जाईल. यावर्षी को ०११८, को १६० आणि १५०२३ या प्रजातीमध्ये ०२३८ च्या तुलनेत रोगांचा प्रादुर्भाव कमी दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी को ०२३८ हे बियाणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here