साखर कारखान्यांना ४ वर्षात इथेनॉल विक्रीतून ३५,००० कोटींचा महसूल

नवी दिल्ली : देशातील साखर कारखान्यांनी गेल्या चार हंगामात देशातील इंधन वितरण कंपन्यांना इथेनॉल विक्री करून जवळपास ३५,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. हंगाम २०२०-२१ मध्ये जवळपास २२ लाख टन साखरेचे रुपांतर इथेनॉलमध्ये करण्यात आले. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री स्वाध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, साखर कारखाने/ डिस्टिलरींकडून ओएमसींना इथेनॉल विक्री करून आतापर्यंत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ च्या चार हंगामात जवळपास ३५,००० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास कारखान्यांना मदत झाली आहे.

केंद्र सरकार साखर कारखान्यांना अतिरिक्त साखर निर्यात करणे आणि अतिरिक्त ऊस, साखरेचे रुपयांतर इथेनॉलमध्ये करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे कारखान्यांकडील अतिरिक्त साखरेची समस्या समाप्त होईल. यातून साखर कारखान्यांच्या तरतलेमध्ये सुधारणा होईल. ते शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे देऊ शकतील. साखर निर्यात, तरलेतमध्ये सुधारणा आणि शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास कारखान्यांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकार दीर्घ काळापासून मदत करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here