गेल्या 24 तासात कोरोनाचे 36,652 नवे रुग्ण, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 90 लाखा वर

138

नवी दिल्ली: देशामध्ये कोविड 19 चे 36,652 नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे संक्रमितांची संख्या शनिवारी 96 लाखाच्या वर गेली आहे. यापैकी 90 लाख पेक्षा अधिक रुग्ण कारेेोनामुक्त झाले आहेत. यामुळे कोरोनामुक्त होणार्‍यांचा राष्ट्रीय दर वाढून 94.20 टक्के झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशामध्ये कोरोनाचे 36,652 नवे रुग्ण समोर आल्याबरोबर संक्रमितांची संख्या वाढून 96,08,211 इतकी झाली आहे. तर 512 आणखी लाकांच्या मृत्युनंतर मृतकांची संख्या वाढून 1,39,700 झाली आहे.

देशामद्ये आतापर्यंत 90,58,822 लोक संक्रमणमुक्त झाले आहे आणि संक्रमणमुक्तीचा राष्ट्रीय दर वाढून 94.20 टक्के झाला आहे. तर मृत्यु दर 1.45 टक्के आहे. आकड्यांनुसार देशामद्ये यावेळी 4,09,689 रुग्णांवर उपचार सुरु आहे, जो एकूण रुग्णांच्या 4.35 टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखापेक्षा कमी आहे. तर गेल्या 24 तासात 42,533 रुग्ण बरे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here