अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ३९२ कोटींची एफआरपी थकीत

अहिल्यानगर : यंदा सर्वच कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांपैकी काही कारखान्यांनी फेब्रुवारीमध्ये तोडणी केलेल्या उसाचे पैसे अद्यापही अदा केलेले नाहीत. ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असते. मात्र, या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीचे ३९२ कोटी रुपये थकवले आहेत.

जिल्ह्यातील खासगी व सहकारातील दहा कारखान्यांनी ३० ते ७० कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे. तीन महिन्यांनंतरही कारखान्यांकडील पैशांची प्रतीक्षा आहे. या कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा बजावत सुनावणी घेतली आहे. त्यांच्यावर ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार आरआरसी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा केवळ सी हेवीपासून इथेनॉल उत्पादनाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ होऊन दर कमी झाले. इथेनॉलचे पैसे अल्पावधीत मिळतात. या मुद्यावरून अनेक कारखान्यांनी राज्य सरकारकडे बोट दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here