फडणवीस सरकारने साखर कारखान्यांना दिलेली बँकहमी रद्द

फडणवीस सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रिय निर्णय घेताना पक्षातील काही नेत्यांनाही खूश करणारे निर्णय घेतले होते. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे आणि सोलापूर जिल्ह्यातील नेते कल्याणराव काळे या मर्जीतील नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी कोट्यवधी रुपयांची मदत देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बासनात गुंडाळला.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या साखर कारखान्यांना द्यावयाच्या मदतीचा विषय चर्चेला आला तेव्हा मुळातच आर्थिक अडचणीत असलेल्या या आजारी साखर कारखान्यांना मदत देऊन काय साध्य होणार अशी भूमिका घेत साखर कारखान्यांना मदत देणारा जुन्या सरकारचा निर्णय बासनात गुंडाळण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

कारखान्यांना सरकारच्या हमीमुळे राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत (एनसीडीसी) कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र ज्या कारखान्यांचे नेटवर्थ पॉझिटिव्ह आहे, त्याच्याकडे सरकारची कोणतीही देणी शिल्लक नाहीत, शेतकर्‍यांची देणी थकलेली नाहीत अशा काही जाचक अटी प्रशासनाने टाकल्यामुळे या कारखान्यांची कोंडी झाली होती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here