नॉर्वेमध्ये साखरेच्या दरात ४० टक्क्यांची वाढ

ओस्लो : नॉर्वेमध्ये खाद्यपदार्थांच्या मुलभूत उत्पादन किमतीत ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे आता खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होऊ शकते असा इशारा खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांनी दिला आहे. सध्या नॉर्वेत साखरेच्या दरात जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. वनस्पती तेल ६० टक्क्यांनी महागले आहे. ओर्कलाचे सीईओ जान इवर सेमलिट्स यांनी सांगितले की, साखर वाहतूक दहा पटींनी महागली आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे.

ओर्कलाकडून दरवाढ केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, गेल्या वीस वर्षात कधीच अशी स्थिती पाहायला मिळाली नव्हती. आगरानेही दर वाढीची शक्यता वर्तवली आहे. आगराचे सीईओ नेट के हेजे यांनी सांगितले की ही उच्च दरवाढीची एक असामान्य स्थिती आहे. मुलभूत वस्तूंच्या दरात अनाकलनीय वाढ झाली आहे. रेपसीड तेलाच्या किमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. आमच्याकडे वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि अल्युमिनियमच्या दरात ५० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here