मेघालयात एका वर्षात इथेनॉलसह इतर उद्योगांमध्ये ४,००० कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री कॉनरॅड के. संगमा

शिलाँग : राज्यात ८००० कोटी रुपयांची भरीव खाजगी गुंतवणूक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे असे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के. संगमा यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात सुमारे ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, ज्यामध्ये २५०० कोटी रुपयांचा ४५० मेगावॅट वीज निर्मिती करणारा औष्णिक ऊर्जा प्रकल्प, इथेनॉल प्लांट, शीतपेये आणि पंचतारांकित हॉटेल्सची चेन यांचा समावेश आहे. तुरा येथे “मानव विकास नेतृत्व कार्यक्रम” या विषयावरील कार्यशाळेला संबोधित करताना मेघालयचे मुख्यमंत्री म्हणाले की, मेघालयातील वाढती गुंतवणूक हा नवीन औद्योगिक धोरणाचा परिणाम आहे. ज्यामुळे व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी एक पूरक वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमात पाच जिल्ह्यांतील डीसी, बीडीओ आणि इतर जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय अधिकारी सहभागी झाले होते. यापूर्वी गुंतवणूकदारांना परावृत्त करणाऱ्या धोरणांबद्दल बोलताना ते म्हणाले, आधीची व्यवस्था कंटाळवाणी आणि वेळखाऊ होती. आमच्या नवीन औद्योगिक धोरणाने दिलेल्या मुदतीत विविध वैधानिक आवश्यकता मंजूर करून घेण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान केले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सुविधा मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here