आता 42 योजनांची माहिती मोबाईल स्क्रीनवर

311

यवतमाळ : कोरडवाहू शेतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एकाच पिकावर अवलंबून आहेत. विविध कारणांमुळे पिकाच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतकर्‍यांमध्ये नैराश्य वाढून आत्महत्येसारखे प्रकारही घडतात. यामुळेच यवतमाळ जिल्हा अधिक्षक कृषी ,अधिकार्‍यांच्या संकल्पनेतून योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. व्हॉटसअप वर योजना किंवा स्कीम असे टाइप करुन पाठविताच तब्बल 42 योजनांची माहिती मोबाईल स्क्रीनवर उपलब्ध होते.

हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी पुढाकार घेतला आहे. या 42 योजनांमध्ये मृद व जलसंधारणासह, पाणलोट विकास, वसुंधरा, राष्ट्रीय फळबाग अभियान, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री किसान मानधन, वनशेती ,शेततळे, मिनी राइस मिल अशा योजनांची माहिती उपलबध करुन देण्यात आली आहे.
राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची अमरावती विभागीय आयुक्तांकडून देखील दखल घेण्यात आली आहे. आपल्या व्हॉटसअप वरुन 9404396119 या क्रमांकावर योजना किंवा स्कीम असे लिहून पाठवावे. त्यानंतर लगेच 42 योजनांची माहिती, व त्यांच्या लाभासाठी लागणारे दस्तऐवज अशी सर्व माहिती मोबाईल स्क्रीनवर उपलब्ध होते. ज्या योजनेची माहिती हवी आहे त्याचा कोड परत त्याच क्रमांकावर व्हॉटसअप करावा लागतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here