दौलत कारखान्याच्या ४४ एकर जमिनीवर काहींचा डोळा : अथर्व-दौलतचे प्रमुख मानसिंग खोराटे

कोल्हापूर : दौलत शेतकरी साखर कारखान्याच्या ४४ एकर जागा खरेदी-विक्रीचा व्यवहार परस्पर सुरू आहे. सभासदांना विचारून ही खरेदी-विक्री केली जात आहे का? असा सवाल अथर्व-दौलतचे प्रमुख मानसिंग खोराटे यांनी केला. चंदगड तालुक्यातील दहावी- बारावी परीक्षेत भरघोस यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व तोडणी – ओढणी कामगार, शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. तहसीलदार राजेश चव्हाण, पो. नि. विश्वास पाटील, अॅड. संतोष मळवीकर, बाळाराम फडके यांच्यासह विविध भागांतून सभासद, शेतकरी उपस्थित होते.

मानसिंग खोराटे म्हणाले की, तालुक्यातील आरोग्य व्यवस्था पाहता जनतेसाठी सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा अथर्वचा मानस आहे. सध्या कारखान्याची ४४ एकर जागा एक संस्था नावावर लावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये चेअरमन लिहून देणार तर विशाल पाटील लिहून घेणार असे म्हटले आहे. याला कार्यकारी संचालक हे मान्यता देत आहेत. मात्र, सभासदांनी मान्यता दिली आहे का अशी विचारणा खोराटे यांनी शेतकरी मेळाव्यात उपस्थित कार्यकारी संचालक मनोहर होसूरकर यांना केली. यावेळी उपस्थित असलेले गडहिंग्लज बाजार समिती माजी सभापती तुकाराम बेनके यांनी संबंधीतांवर फौजदारी करा, अशी मागणी केली. कारखाना टेक्निकल कारणांमुळे अद्यापही सुस्थितीत नाही; पण येत्या काळात कारखाना सक्षम पद्धतीने चालवू. कामगारांनी संयम पाळावा, कारखान्याना देय-देणी देणार आहे. शेतकऱ्यांचे हायकोर्टात अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here