जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांकडे ४८५ कोटींची थकबाकी

203

सहारनपूर : बडगाव विभागात महिपाल सिंह यांच्या निवासस्थानी पश्चिम विभाग मुक्ती मोर्चाची बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष भगत सिंह वर्मा यांनी सांगितले की, गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये सहारनपूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांवर ४८५ कोटी रुपयांची उसाची थकबाकी शिल्लक आहे. सर्वाधिक उसाची थकबाकी २१२ कोटी रुपये आणि व्याज १२५ कोटी रुपयांची थकबाकी गंगनौलीच्या हिंदुस्थान साखर कारखान्यावर आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांकडून ऊस उधारीवर खरेदी करून कोट्यवधींचा लाभ मिळवतात. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशांसाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याची स्थिती आहे.

त्यांनी सांगितले की, भारत सरकारच्या शुगर कंट्रोल ऑर्डरनुसार साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. जे कारखाने पैसे देणार नाही, त्यांनी शेतकऱ्यांना वार्षिक १५ टक्के व्याज द्यावे लागेल. भाजपच्या योगी सरकारने यापूर्वी गेल्या चार वर्षात ऊसाचा दर एक रुपयानेही वाढवलेला नाही. उसासाठी ४४० रुपये क्विंटल खर्च येत आहे. त्यामुळे उसाचा दरही तसाच असायला हवा. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष राजेंद्र चौधरी होते. त्यांनी सांगितले की, आठ महिन्यांपासून राज्य आणि देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत. तरीही दिल्ली आणि लखनौतील नेते त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

या बैठकीचे संचालन प्रदेश मंत्री आसिम मलिक यांनी केले. बैठकीस कालूराम प्रधान, पुरुषोत्तम शर्मा, पुनीत प्रधान, सुचित, मोहम्मद फारुख, रविंद्र प्रधान, नीरज सैनी, सुधीर चौधरी, जोगेंद्र सिंह, हरपाल सिंह, सुभाष त्यागी, संजय पुंडीर, राजकुमार चौहान आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here