साखर कारखान्यातील 5 कामगार रस्ते अपघातात ठार

114

रामपूर(उत्तरप्रदेश ): कारने रामपूरला येत असताना बुधवारी पहाटे लग्न समारंभाला जाणार्‍या एका खासगी बसला धडकून कारमधील साखर कारखान्याचे पाच कामगार जागीच ठार झाले तर चार जखमी झाले. हा अपघात शहाबाद परिसरात घडला.

अधिक माहिती देताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक़ (एएसपी) विद्या सागर शर्मा म्हणाले, हे कर्मचारी राणा साखर कारखान्याचे कामगार असून कारखान्यातून परत जाताना बांदर गावाजवळ ठाकिया रोडवर त्यांची कार बसला धडकली.

या अपघातात मुकेश, हरबीर, शिव चरण, डिगू आणि अमित हे कामगार जागींच ठार झाले असून पोस्बल, इम्रान, वीरेश आणि अंकुश हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here