शिरोळ तालुक्यात शॉर्टसर्किटने ५० एकरांतील ऊस खाक

कोल्हापूर : हेरवाड (ता. शिरोळ) येथे उसाला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ५० एकरातील ऊस जळून खाक झाला. बुधवारी (20 डिसेंबर) दुपारी ही घटना घडली. येथील देसाई मळा परिसरात अचानक आगीच्या धुराचे लोट पसरू लागले. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग पसरू लागली. वसंतराव देसाई, रावसाहेब माने, शंकर माने, सुभाष उगारे, दादा पाटील, रावसाहेब पाटील, विजय पाटील, सचिन देबाजे, अजित उगारे, सुभाष देबाजे आदी शेतकऱ्यांचे ५० एकरहून अधिक ऊस क्षेत्र जळून खाक झाले.

कुरुंदवाड नगरपरिषद, गुरुदत्त कारखाना, दत्त कारखान्याच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. परिसरातील शेतकऱ्यांनी पेटत असलेल्या उसालगत आग पसरू नये म्हणून एका सरीतील ऊस तोडून पाला बाजूला करत आगीला रोखत इतर क्षेत्र जळण्यापासून वाचवले. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here