पाकिस्तानमध्ये गोदामावर छाप्यात ५०० पोती साखर जप्त

फैसलाबाद : तहसीलदार कार्यालयाने जारनवाला येथे मंगळवारी एका गोदामावर छापा टाकून ५०० पोती साखर जप्त केली. जारनवालाचे आयुक्त जैनुल आबिदीन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुहम्मद सिद्दीकी यांच्या गोदामावर छापा टाकला. तेथे साठवून ठेवलेली ५०० पोती साखर जप्त केली.

पाकिस्तानमध्ये साखरेचा तुटवडा आहे. त्यामुळे सरकारने भारताकडून साखर आयात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर या निर्णयापासून सरकारने यू टर्न घेतला.

पाकिस्तान सरकारच्या अधिपत्याखाली असलेली ट्रेडिंग कंपनी टीसीपीने सोमवारी ५०,००० टन कच्ची साखर आयात करण्यासाठी जागतिक पातळीवर निविदा मागविली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here