जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ५०२ कोटींची ऊस बिले थकीत

सहारनपूर : प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतरही शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील गांगनौली आणि गागलहेडी साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. आणि इतर कारखानेही हंगाम समाप्त करण्याकडे वाटचाल करीत आहेत. त्यानंतरही जिल्ह्यातील देवबंद वगळता पाच साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५०२.७८ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. देवबंद वगळता इतर कारखान्यांकडून ऊस बिले देण्याबाबत बेफिकीरी दिसून येत आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस खरेदी अधिनियमानुसार ऊस कारखान्याला पाठविल्यानंतर चौदा दिवसात पैसे शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. त्यानंतर व्याजासह पैसे द्यावेत अशी कायदेशीर तरतूद आहे. जिल्ह्यात गांगनौली साखर कारखान्याकडे सर्वाधिक थकबाकी आहे. गांगनौली आणि गागलहेडी कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट आहे. गांगनौली कारखान्याकडे ३०१.५२ कोटी रुपये थकबाकी आहे. कारखान्यांना लवकरात लवकर ऊस बिले द्यावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. उशीरा बिले देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा ऊस अधिकारी सुशील कुमार यांनी सांगितले. शेरमऊ कारखान्याकडे ४१.८० कोटी, गागलहेडी कारखान्याकडे ६६.२ कोटी, नानौता कारखान्याकडे ६८.०२ कोटी आणि सरसावा कारखान्याकडे ४५.३४ कोटी रुपये थकीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here