महाराष्ट्रामध्ये आणखी 51 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

132

महाराष्ट्रामध्ये आणखी 51 पोलिस कोरोना पॉझिटीव्ह
कोरोना चा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. महाराष्ट्रात सामान्य लोकांसह आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचार्‍यांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यामध्ये आणखी 51 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. ज्यामुळे सोमवारी कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यांची एकूण संख्या 1,809 वर पोचली आहे.

पोलीसांच्या अनुसार, एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये 194 पोलीस अधिकारी आणि 1,615 इतर रँकवाले पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले की, एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 678 आतापर्यंत बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, महाराष्ट्रामध्ये 50,231 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 14,600 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यामध्ये कोविड 19 मुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1,635 झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here