बिहारमध्ये पावसामुळे 55 मृत्यू, पाटण्यात पाण्याची पातळी अद्यापही कायम

पटणा : सप्टेंबरच्या शेवटच्या तीन दिवसांत बिहारमध्ये झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे ५५ लोकांना प्राण गमवावे लागले. पाऊस थांबल्यानंतर दोन दिवस झाले असले तरी, पाटण्यातील पाण्याची पातळी अद्याप खाली गेलेली नाही, त्यामुळे साथीच्या आजाराची भीती आहे. आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कबूल केले की, शहरातील वॉटर पम्प काम करत नाहीत. पाणी संकट संपल्यानंतर ते नगरविकास मंत्रालयालयाचा कार्यभार घेणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून, शहरात तरंगत असलेल्या कुत्री आणि डुकरांच्या तसेच जनावरांच्या मृतदेहामुळे आरोग्याच्या प्रचंड चिंता वाढल्या आहेत. नागरी अधिकाऱ्यांनी प्राण्यांचे मृतदेह काढण्यास सुरवात केली असली तरी त्यांची गती मंद आहे. मंगळवारी पंपिंग स्टेशनचे सर्वेक्षण करणारे कुमार म्हणाले की, कालपर्यंत ५o टक्के पंप कार्यरत नव्हते त्यामुळे हे पाणी येत्या काही दिवसांत बाहेर काढले जाईल. नगरविकास मंत्रालयातील काम “समाधानकारक असून, अजूनही बरेच काम करण्याची गरज असल्याचे कुमार यांनी सांगितले. तसेच भविष्यात आपण यावर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवू, असेही ते म्हणाले.

ग्रामीण विकास मंत्रालय २००५ पासून भाजपाच्या नियंत्रणा खाली असल्याचे कुमार यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी, कुमार यांच्यावर वॉटर लॉगिंग बाबत भाजपाने हल्लाबोल चढवला होता. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यावर मुख्यमंत्र्यांची उघडपणे टीका झाली आहे. कुमार यांच्या मंत्रिमंडळाचे माजी सदस्य गिरीराज सिंह म्हणाले होते की, राज्य सरकार पाटणावासीयांची माफी मागण्यास पात्र आहे. संजय जयस्वाल यांनी ही शासकीय दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली.

सरकारने आज सांगितले की, १५ जिल्ह्यातील  ९५९ गावे पुरामुळे धोक्यात आली आहेत. यामुळे सुमारे 21.45 लाख लोकांवर परिणाम झाला आहे. लोकांच्या मदतीसाठी 45 मदत शिबिरे आणि 324 सामुदायिक स्वयंपाकघर चालवले जात आहेत. पूरग्रस्त लोकांना बाहेर काढण्यासाठी 1000 हून अधिक बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here