31 डिसेंबर ला 5,68,824 आयकर रिटर्न दाखल

आर्थिक वर्ष 2019-20 साठी 31 डिसेंंबर ला संध्याकाळी चार वाजेपर्यंत 5,68,824 आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. तर शेवटच्या एका तासात 84,468 आयटीआर फाईल झाले आहेत. 30 डिसेंबर पर्यंत 4.73 करोड पेक्षा अधिक़ आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. आयकर विभागाने बुधवारी ही माहिती दिली. सरकारने व्यक्तिगत आयकर दात्यांसाठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवून 10 जानेवारी 2021 केली आहे. यापूर्वी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 होती. याप्रमाणे कंपन्यांसाठी ही आयकर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी ही वाढवून 15 फेब्रुवारीं केली आहे.

आयकर विभागाने गुरुवारी ट्वीट केले की, आर्थिक वर्ष 2020-21 साठी 30 डिसेंबरपर्यंत 4.73 करोड आयकर रिटर्न दाखल करण्यात आले. यापूर्वी गेल्या आर्थिक वर्षामध्ये तुलनात्मक अवधी पर्यंत 5.12 करोड आयकर रिटर्न दाखल करण्यात आले होते. विना विलंब शुल्काच्या आर्थिक वर्ष 2018-19 साठी अंतिम दिनांकापर्यंत 5.65 करोड आयकर रिटर्न दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी आयकर रिटर्न दाखल करण्याच्या तारखेला 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढवण्यात आले होते.

दाखल करण्यात आलेल्या आयकर रिटर्नमधून 2.61 करोड करदात्यांनी आईटीआर 1 दाखल केला आहे. गेल्या वर्षी 30 ऑगस्टपर्यंत हा आकडा 2.91 करोड इतका होता. 30 डिसेंबरपर्यंत 1.05 करोड आईटीआर 4 दाखल करण्यात आले. तर 30 ऑगस्ट, 2019 पर्यंत 1.10 आईटीआर 4 दाखल करण्यात आले. आईटीआर 1 सहज फॉर्मला कोणताही सामान्य नागरीक, ज्याचे वार्षिक उत्पन्न 50 लाखापेक्षा अधिक नाही, आपल्या व्यक्तिगत उत्पन्नाच्या बाबतीत माहिती देवून भरु शकतो.

तर आईटीआर 4 सुगम फॉर्म ला असा नागरीक हिंदू अविभाजित कुटुंब आणि फर्म (एलएलपी सोडून) कडून भरु शकतात, ज्यांना व्यवसायातून 50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. तर आईटीआर 3 आणि 6 व्यावसायिकांसाठी, आईटीआर 2 आवासीय संपत्तीपासून उत्पन्न मिळवणार्‍या लोकांकडून भरला जातो. आईटीआर 5 फॉर्म एलएलपी आणि एसोसिएशन ऑफ पर्सन साठी, तर आईटीआर 7 त्या लोकांसाठी आहे ज्यांना ट्रस्ट किंवा इतर कायदेशीवर दायित्वांअंतर्गत ठेवण्यात आलेेल्या संपत्तीतून उत्पन्न मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here