सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना निवडणुकीसाठी ५८ अर्ज दाखल

कोल्हापूर: लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 58 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कारखान्यासाठी 21 संचालक निवडून देण्यात येणार आहेत. 26 मे 2023 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन, खासदार संजय मंडलिक, बापूसाहेब भोसले-पाटील, वीरेंद्र मंडलिक, संभाजी मोरे, आनंदा देवडकर, तुकाराम ढोले आदींनी अर्ज दाखल केले.

बोरवडे, मुरगूड, मौजे सांगाव, सेनापती कापशी आणि कागल या पाच विभागातून एकूण 15 संचालक निवडले जाणार आहेत. उर्वरित संचालकांची निवड संस्था गट, एससी-एसटी गट, ओबीसी आणि दोन महिला संचालक म्हणून केली जाणार आहे. 29 मे 2023 रोजी उमेदवारांची छाननी होणार असून 30 मे ते 13 जून 2023 पर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी 14 जून 2023 रोजी प्रसिद्ध केली जाईल. 25 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून 27 जून 2023 रोजी मतमोजणी होणार असून कागल-राधानगरी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here