आजरा साखर कारखान्यासाठी ६०.६८ टक्के मतदान, उद्या मतमोजणी

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी प्रचंड चुरशीने सरासरी ६०.६८ टक्के मतदान झाले. कारखान्या्च्या एकूण ३२ हजार ७८४ सभासदांपैकी १९ हजार ८६६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. कारखान्याच्या या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांची चाळोबादेव शेतकरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मिळून केलेली रवळनाथ शेतकरी विकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मतदान कमी झाले आहे.त्याचा परिणाम कोणावर होणार याची उत्सुकता आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. एकूण २० जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी (19 डिसेंबर) सकाळी ८ वाजल्यापासून पंचायत समिती आजराच्या हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मतदान प्रक्रियेवेळी बोगस मतदान केल्याप्रकरणी हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकारामुळे मडिलगेत सायंकाळी तणावपूर्ण वातावरण होते. मडिलगेतील १७ व १८ नंबरच्या केंद्रांवर हा प्रकार उघडकीस आला. श्री चाळोबादेव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही केंद्रांवर फेर मतदानाची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here