कोल्हापूरमध्ये ६० एकरांतील ऊस जळून खाक, लाखोंचे नुकसान

कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा तालुक्यात ऊसाच्या फडाला अचानक आग लागली. या आगीत सुमारे ६० एकरांतील ऊस जळून नष्ट झाला. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.

आजरा तालुक्यातील भादवण येथे ही घटना गावच्या यात्रेदिवशी घडली. आगीत जवळपास ८०० टन ऊस जळाला ‌ प्राथमिक माहितीनुसार या आगीत परिसरातील ५० शेतकऱ्यांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आग इतकी मोठी होती की परिसरात चार किलोमीटर अंतरावर धूर दिसत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here