नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या गळीत हंगामात सुरू राहिलेल्या ५१६ कारखान्यांच्या तुलनेत आतापर्यंत ५२८ कारखान्यांनी कामकाज सुरू केले होते. चालू गळीत हंगामात आतापर्यंत ६१ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. तर देशात सध्या ४६७ साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. दरम्यान, गेल्या हंगामात २०२१-२२ मध्ये समान कालावधीत ३२ कारखान्यांनी गाळप बंद केले होते. आणि जवळपास ४८४ कारखाने अद्याप सुरू होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाची सारांशाने माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे. हा तक्ता चालू वर्षासह गेल्या वर्षी २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी राज्यवार अनुमानित साखर डायव्हर्शनचीही माहिती देतो. अशा पद्धतीने या तालिकेतून इथेनॉलकडे डायव्हर्शन केल्यानंतर आणि डायव्हर्शन न करता गेल्या दोन वर्षातील साखर उत्पादनाचे स्पष्ट संकेत मिळतात.