नॅशनल शुगर फेडरेशनची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

62

नवी दिल्ली : उसाचा रस, शुगर सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजची (एनएफसीएसएफ) नुकतीच ६२ वी वार्षिक बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि एनएफसीएसएफचे नवनिर्वाचीत अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर होते.

दांडेगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, २७४ लाख टन साखर उत्पादन आणि १०५ लाख टन अतिरिक्त साखर उत्पादनासह २०१९-२० हा हंगाम समाप्त झाला आहे. त्यामुळे हा २०२०-२१ चा सुरुवातीच्या काळातील साठा तयार झाला. २०२०-२१ या हंगामात देशात साखरेचे उत्पादन ३०९ लाख टन होण्याची शक्यता आहे. तर २०१९-२० मध्ये २७४ लाख टन साखर उत्पादन होते. ज्यूटच्या पोत्यांमध्ये २० टक्के साखरेचे पॅकिंग करण्याची अट रद्द केली गेली पाहिजे. दर स्थिरावण्यासाठी निधी तसेच आर्थिक तरलतेसाठी बजेटची तरतुद करण्याची गरज आहे.

दांडेगावकर म्हणाले, सातत्याने साखर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आदी प्रमुख साखर उत्पादक राज्यांत चांगल्या हवामानामुळे चांगले उत्पादन झाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here