कोरोना: 24 तासांमध्ये देशात 69 हजार नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासांमध्ये 69 हजार नवे कोरोनारुग्ण समोर आले आहेत. देशामद्ये 29 लाखावर कोरोना रुग्ण असून जवळपास 55 हजार मृत्यु कोरोनामुळे झाले आहेत.

भारतामध्ये कोरोना संक्रमण किती वेगाने पसरत आहे, याचा अंदाज रोज वाढणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लावला जावू शकेल. देशामध्ये गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे 68,898 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आणि 983 लोकांचा मृत्यु झाला आहे. ही कोरोनारुग्णांची संख्या जगभऱात एका दिवसात आलेल्या रुग्णांची सर्वात मोठी संख्या आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये गेल्या दिवसात क्रमश: 45,341 आणि 44,684 नवे रुग्ण समोर आले आहेत. यापूर्वी भारतामध्ये 19 ऑगस्ट ला रेकॉर्ड 69,652 कोरोना रुग्ण होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here