आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ७.३८ कोटी आयटीआर दाखल

नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात, ७.३८ कोटींहून अधिक आयटीआर दाखल झाले आहेत. यासोबतच गेल्या वर्षांमधील आयटीआर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरात सांगितले की, २०१८-१९ मध्ये दाखल करण्यात आलेल्या आयटीआरची (सुधारित रिटर्नसह) एकूण संख्या ६.७४ कोटींहून अधिक आहे. तर २०१९-२० मध्ये ६.७८ कोटींहून अधिक तर २०२०-२१ मध्ये ७.३८ कोटींहून अधिक आहे.

मंत्र्यांनी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आयटीआरच्या ई पडताळणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेपरलेस कामकाजासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फॉर्म २६ एएसमध्ये बदल करुन टीडीएस कपात, कर भरणा, आर्थिक देवाण-घेवाण आदी माहितीचा यात समावेश आहे
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here