उत्तर प्रदेशात आतापर्यंत ७१.७० टक्के ऊस बिले अदा

उत्तर प्रदेशमध्ये चालू गळीत हंगामात साखर उत्पादनात घट दिसून आली आहे. मात्र ऊस बिले देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे साखर कारखाने वेळेवर ऊस बिले देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार, ११ एप्रिल २०२२ पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ९१३.०० लाख टन ऊसाचे गाळप करुन ९२.३४ लाख टन साखर उत्पादन केले आहे. आणि आतापर्यंत २०,९५६.६३ कोटी रुपये म्हणजे ७१.७० टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत.

सध्याच्या सरकारच्या काळात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये २०,९५७.६३ कोटी रुपये, गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ३२,८९५.९३ लाख कोटी रुपये, गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ३५,८९८.८५ कोटी रुपये तसेच गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये ३३,०४८.०६ कोटी रुपये, २०१७-१८ मधील ३५,४४४.०६ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. तसेच गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील १०,६६१.८५ कोटी रुपयांसह आतापर्यंत एकूण १,६८,९०५.३८ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here