उत्तर प्रदेशात चालू हंगामात आतापर्यंत ७१ टक्के ऊस बिले अदा

उत्तर प्रदेशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अनेक साखर कारखान्यांनी गाळप बंद करण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत राज्यात या हंगामात शंभर टक्के ऊस बिले देण्यात आलेली नाहीत. कारखान्यांनी लवकरात लवकर ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना द्यावीत यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

२६ मार्चअखेर उत्तर प्रदेशमध्ये २०२१-२२ या हंगामात साखर कारखान्यांनी ८३३.६० लाख टन उसाचे गाळप करुन ८४.०६ लाख टन साखर उत्पादीत केली आहे. सरकारकडील आकडेवारीनुसार, आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १८,६४७.८३ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. एकूण ऊस बिलांच्या हे प्रमाण ७१.२८ टक्के इतके आहे.

राज्यात २०२०-२१ या हंगामात शंभर टक्के ऊस बिले अदा करण्यात आली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या हंगामापासून आतापर्यंत ३२,८७२.२८ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. एकूण ९९.५७ टक्के बिले अदा झाली आहेत. याशिवाय २०१८-१९ आणि २०१९-२० या हंगामातीलही शंभर टक्के बिले दिली गेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here