कर्नाटक : मायशुगर साखर कारखान्याकडून ८ लाख टन ऊस गाळप शक्य

मंड्या : मायशुगर साखर कारखाना सुरू होण्याच्या वृत्तामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. या हंगामात साखर कारखाना चांगली कामगिरी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पांडवपुराचे सहाय्यक आयुक्त शिवानंदमूर्ती यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला मायशुगर कारखान्याचे राज्य सरकारकडून पुनरुज्जीवन केले जात आहे. या वर्षी जुलै महिन्यात त्याचे कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यांनी सांगितले की, एका हंगामात ८ लाख टन गाळप करण्याची क्षमता कारखान्याची आहे. रायथा बंधू मंड्या फाऊंडेशन (Raitha Bandu Mandya Foundation) आणि शेतकऱ्यांच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात मायशुगर कारखाना परिसरात बोलताना त्यांनी सांगितले की, मंड्या जिल्ह्यात राज्य सरकारच्या मालकीचा हा कारखाना आहे. त्याच्या विकासासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. तरच प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ मिळेल.

त्यांनी कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी मायशुगरच्या कार्यक्षेत्रातील सर्व कामगार, अधिकारी, शेतकरी, ऊस उत्पादकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. मायशुगरचे कार्यकारी संचालक ए. सी. पाटील यांनी कारखाना परिसरातील सफाईसाठी रायथा बंधू मंड्या फाऊंडेशन आणि शेतकऱ्यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले की, या वर्षी जुलै महिन्यात कारखान्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. कारखाना यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here