देशामध्ये सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाने गाठला उच्चांक, गेल्या 24 तासात 97,570 नवे रुग्ण

129

नवी दिल्ली: देशामध्ये सलग तिसर्‍या दिवशी कोरोना संक्रमाणाने उच्चांक गाठला आहे. हा तिसरा दिवस आहे जेव्हा एका दिवसामध्ये 95 हजार पेक्षा अधिक कोरोनाच्या केस समोर आल्या आहेत. शनिवारी 97,570 नवे रुग्ण समोर आले आहेत. या नव्या रुग्णांबरोबरच देशामध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढून 46 लाख 59 हजारापेक्षा अधिक झाली आहे. पण ही बाब दिलसादायक आहे की कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. आकड्यांनुसार, आतापर्यंत 36 लाख 24 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, कोरोनामुक्त रुग्णांचा दर वाढून 77.77 टक्के झाला आहे, तर मृत्यु दरातही मोठी घट झाली आहे आणि हा दर 1.66 टक्के झाला आहे. तर 20.56 टक्के रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. देशामध्ये कोरोना मृत्यु दर जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशभरामध्ये 11 सप्टेंबर पर्यंत एकूण 5,51,89,226 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, यामद्ये शुक्रवारी एका दिवसामध्ये 10,91,251 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीची संख्या गुरुवारच्या तुलनेत कमी आहे, पण रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here