पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ९९.२४ टक्के एफआरपी अदा

पुणे : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारी महिनाअखेर उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) देय रक्कम २,३८३ कोटी रुपये आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी ऊसतोडणी वाहतूक खर्चासह २,३६५ रुपये म्हणजे सुमारे ९९.२४ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहे. जिल्ह्यातील १४ पैकी ९ साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम गोड झाल्याचे स्पष्ट होते.

जिल्ह्यातील श्री सोमेश्वर, भीमाशंकर, माळेगाव, विघ्नहर, श्रीछत्रपती, संत श्रीतुकाराम या सहा सहकारी साखर कारखाना आणि व्यंकटेश कृपा या कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्क्यांहून अधिक रक्कम दिली आहे. एफआरपीची सर्वाधिक रक्कम बारामती ॲग्रो या खासगी कारखान्याने दिली असून, ती ३३७.४० कोटी रुपये आहे. सोमेश्वर सहकारी कारखान्याने २८६.९६ कोटी, माळेगावने २४८.५४ कोटी, दौंड शुगरने २३६.६६, भीमाशंकर सहकारी कारखान्याने २२३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here