मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे महापुराचे संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणच्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. कोकणात पावसाची संततधार सुरू असल्याने रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आतापऱ्यंत आठजणांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन काळात मदतीसाठी, नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ आणि वायुसेनेची पथके तैनात करण्यात आली आहेत. पावसामुळे अनेक मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुण्यानजिकच्या भीमाशंकर मंदिराच्या गर्भगृहापऱ्यंत पाणी पोहोचले आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. पुरात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी प्रशासनाच्या मदतीसाठी वेस्टर्न नेव्हल कमांडने हेलिकॉप्टर आणि फूड रेस्क्यू टीम पाठवली आहे. नौसेनेची सात पथके रस्ता मार्गे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पाठविण्यात आली आहेत. कोल्हापूरमध्ये नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. तर सातारा जिल्ह्यात कोयना नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Home  Marathi  Hot News in Marathi  पाऊस आणि पुरामुळे महाराष्ट्र बेहाल, कोकणात रत्नागिरी पाण्याखाली, अनेक भागांचा संपर्क तुटला
Recent Posts
भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची चौथी फेरी सुरू
                    आणि परस्पर फायदेशीर भागीदारी पुढे नेण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या मार्च 2025 मधील भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे...                
            मागील बिल द्या; मगच धुराडी पेटणार : माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा
                    कोल्हापूर : राज्यातील सर्व साखर कारखानदार व केंद्र शासन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. ऊस उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. साखर कारखानदारांना...                
            महाराष्ट्र में 2 दिसंबर को होंगे नगर निकाय चुनाव
                    मुंबई : राज्य चुनाव आयुक्त दिनेश वाघमारे ने मंगलवार को घोषणा की कि, महाराष्ट्र के स्थानीय निकाय चुनाव चरणों में होंगे, जिसका पहला चरण...                
            महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार
                    मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी जाहीर केले की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील, पहिला टप्पा २ डिसेंबर...                
            पीक विमा दाव्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींसंदर्भात शिवराज सिंह चौहान यांचा कठोर पवित्रा, दिल्लीत पोहोचताच तातडीने...
                    पंतप्रधान पीक विमा योजनेशी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि दाव्यांबद्दलच्या त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज...                
            GEMA ने उच्च एथेनॉल मिश्रण हेतु नीतिगत प्रोत्साहन की मांग की
                    नई दिल्ली : अनाज एथेनॉल निर्माता संघ (GEMA) ने भारत सरकार से आग्रह किया कि, वह भारत के अनाज किसानों के उत्थान, ग्रामीण आय...                
            સતારામાં શેરડીના કામદારો અને કોન્ટ્રાક્ટરો સામે છેતરપિંડીના 160 કેસ નોંધાયા
                    પુણે (મહારાષ્ટ્ર): સતારા પોલીસે સોમવારે ખુલાસો કર્યો કે તેમણે 2022 થી 2025 દરમિયાન શેરડીના મજૂર કોન્ટ્રાક્ટરો અને મજૂરો સામે કુલ 160 છેતરપિંડીના કેસ નોંધ્યા...                
            










